कोरेगांव पार्कात हुक्का पार्लर अन् बेकायदा दारू विक्री केन्द्रावर पोलिसांची छापेमारी

Spread the love

कोरेगांव पार्कात हुक्का पार्लर अन् बेकायदा दारू विक्री केन्द्रावर पोलिसांची छापेमारी

योगेश पांडे/वार्ताहर 

पुणे – कोरेगांव पार्कातील नागरिकांशी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी ऐकूण कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कोरेगांव पार्कातील हुक्का पार्लर अन् बेकायदा दारू विक्रीवर पोलिसांनी छापेमारी केली. लेन नं. ७ मधील पॉवर प्लाजा बिल्डिंगमधील हॉटेल पाल्मोकोवर ही कारवाई केली आहे. या प्रकरणी शिवा वासुदेव सरकार (३२), शाहीद निशार अहमद हुसेन (२१) आणि नबिल मकसुद पिरजादे (३०), इम्रान मोहम्मद गौस रेहाली (३३) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार प्रविण सुधीर पडवह यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई हॉटेल पाल्मोका येथे रविवारी सायंकाळी पावणे आठ वाजता करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी कोरेगाव पार्क येथील लेन नं ५, ६, ७ मध्ये पायी पेट्रोलिंग करत नागरिकांशी संवाद साधला. अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांना या अडचणी सोडवण्यासोबतच कारवाईचे देखील आश्वासन दिले. तेव्हा कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पथक लेन नंबर ७ मध्ये पेट्रोलिंग करताना हॉटेल पाल्मोको मध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमधील टेबलवर हुक्का पॉट, तंबाखुजन्य अल फकेर व रॉयल स्मोकीन नावाचे हुक्का फ्लेवर असा २२ हजार ९६ रुपयांचा माल ग्राहकांना धुम्रपानासाठी अवैधरित्या विक्रीकरता ठेवलेला दिसून आला. त्याचप्रमाणे दारु विक्रीची कोणताही परवाना नसताना हॉटेलचे किचन रुममध्ये १३ हजार ५७५ रुपयांच्या दारुच्या बाटल्या आढळून आल्या. पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon