गांजा तस्करांसह चार किलो गांजा जप्त, कल्याण रेल्वे सुरक्षा बलाची कामगिरी
योगेश पांडे/वार्ताहर
कल्याण – हॉटेल मॅनेजमेंट कोर्स झाल्यानंतर भला मोठा कॅफे सुरु केला. मात्र मित्रांच्या नादात नशेच्या आहारी गेला. यात त्याने सर्व काही गमावले. मात्र कर्ज बाजारी झाल्याने त्याने स्वत: गांजाचा तस्कर बनला. गांजा तस्करी करताना कल्याण रेल्वे पोलिसांनी भावेश गायकवाड नावाच्या तरुणाला अटक करुन त्याच्याकडून चार किलो गांजा जप्त केला आहे. हा गांजा तो कोणाला विकणार होता. याचा तपास कल्याण जीआरपी पोलिस करीत आहेत. कल्याण आणि अंबरनाथ दरम्यान आरपीएफचे जवान भुवनेश्वर एक्सप्रेसमध्ये कर्तव्य बजावित असताना, एक तरुण संशयितरित्या प्रवास करताना दिसून आला. आरपीएफच्या जवानांनी या तरुणाला हाटकले. मात्र हा तरुण उत्तर देताना अडखळला . आरपीएफ जवानांनी या तरुणाकडे असलेल्या बॅगची तपासणी केली. बॅगेत त्याच्या काही वस्तू आढळून आले. त्या वस्तूंच्या खाली एका पिशवीत गांजा मिळून आला. आरपीएफ जवानांनी याची माहिती लगेचच कल्याण जीआरपी पोलिसांना दिली. कल्याण जीआरपी पोलिसांनी भावेश गायकवाड या तरुणाला लगेच ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गांजा तस्करीचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान एक्सप्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करत हा प्रवासी धाडसाने एक्सप्रेसमधून अंमली पदार्थ घेऊन प्रवास करत होता. या तरूणाचे धाडस पाहून जवान चक्रावून गेले. कल्याण रेल्वे स्थानकात या प्रवाशाला अंमली पदार्थासह उतरविण्यात आले. तेथे त्यांना कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्यांची सुरक्षा बळ, लोहमार्ग पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी हा तरूण उच्चशिक्षित कुटुंबातील एक उच्चशिक्षित सदस्य असल्याचे आढळले. हा प्रवासी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मोहपाडा येथील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. रेल्वे तिकीट तपासणीसाच्या तत्परतेमुळे हा प्रवासी रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या प्रवाशाची पोलिसांनी त्यांनी गांजा कोठुन आणला. हा गांजा ते कोणाला विक्री करणार होते, या दिशेने तपास करणार आहेत. रायगड ते भुवनेश्वर एक्सप्रेस असा खिशात पैसे नसताना त्यांंनी हा प्रवास कसा केला याचीही माहिती पोलीस काढत आहेत. या प्रवाशाच्या चौकशीतून गांजा तस्करांची टोळी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
भावेश हा रायगड जिल्ह्यात राहतो. तो उच्चभ्रू कुटुंबातील आहे. त्याने हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केला होता. त्याने कोर्स केल्यानंतर पनवेल येथे भला मोठा कॅफे सुरु केला होता. मात्र चांगले सुरु असताना मित्रांसोबत त्याला नशेची लत लागली. या नशेमुळे त्याचा कॅफे बंद पडला. घरातील दागिने काही वस्तू विकून टाकण्याची वेळ आली. तो कर्जबाजारी झाला. आत्ता करायचे काय तर त्याने गांजाची तस्करी सुरु केली. भावेश गायकवाडला आत्ता अटक केली आहे. हा गांजा तो कोणासाठी आणि कुठे घेऊन जात होता ? याचा तपास आता कल्याण जीआरपी पोलिसांनी सुरु केला आहे.