“जनसंवाद अभियान” अंर्तगत पालघर पोलीस दलाकडून रस्ता सुरक्षा अभियान २०२५ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

“जनसंवाद अभियान” अंर्तगत पालघर पोलीस दलाकडून रस्ता सुरक्षा अभियान २०२५ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

प्रमोद तिवारी

पालघर – बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर जिल्हा यांच्या संकल्पनेतुन “जनसंवाद अभियान” अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस व पालघर जिल्हा वाहतुक शाखेमार्फतीने वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन होणेकरीता वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मोटार वाहन अपघातास परीणामकारकरित्या आळा बसावा व नागरीकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरीता दरवर्षी संपूर्ण देशभरात ‘रस्ता सुरक्षा अभियान- “आयोजित करण्यात येते. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीही दि.०१ जानेवारी २०२५ ते दि. ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत ३६ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२५ साजरा करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने पालघर जिल्हा पोलीस व जिल्हा वाहतुक शाखा पालघर यांच्या वतीने दि. ०१ जानेवारी २०२५ ते दि. ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान २०२५ संपुर्ण पालघर जिल्हयात राबविण्यात येत आहे.”रस्ता सुरक्षा अभियान-२०२५’ निमित्ताने बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर जिल्हा यांच्या संकल्पनेतुन जनसंवाद अभियान अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस दल आयोजित जिल्हा वाहतुक शाखा व विक्रमगड पोलीस स्टेशन यांच्या वतीने “रस्ता सुरक्षा अभियान-२०२५’ निमित्ताने १) रस्ते अपघात २) सायबर क्राईम ३) डायल-११२ ३) बालविवाह प्रतिबंध ४) व्यसनाधिनता ५) महिला विषयक कायदे व नवीन कायदे ५) अंधश्रध्दा निमूलन ६) कुपोषण यासारख्या विविध विषयांवर जनजागृती करण्याकरीता दिनांक २३/०१/२०२५ रोजी दुपारी ०२:३० वा. मा.श्री. संजय दराडे (भा.पो.से), विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र यांच्या प्रमुख उपस्थितीत पालघर जिल्हयांतील युट्युब कलाकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

“रस्ता सुरक्षा अभियान-२०२५’ अंर्तगत आरोग्य शिबिर, वाहन चालकांसाठी वाहन परवाना शिबिर इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

तरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी जिल्ह्यातील सर्व नागरीकांना असे आवाहन केले आहे की, रस्ता सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान- २०२५ अंर्तगत वरीलप्रमाणे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असुन सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्व नागरीकांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon