संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी मधील त्या तीन वादग्रस्त अधिकाऱ्यांना हटवलं

Spread the love

संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी मधील त्या तीन वादग्रस्त अधिकाऱ्यांना हटवलं

योगेश पांडे/वार्ताहर 

बीड – खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत एसआयटीतील स्थानिक गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याचा फोटो समोर आल्यानंतर सरकारवर टीका करण्यात आली होती. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल ५ जानेवारी रोजी ट्विट करीत यावर आक्षेप नोंदवला होता. याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही यावर विरोध दर्शविला होता. बीडचे अधिकारी एसआयटी पथकात असतील तर तपास निष्पक्ष कसा होईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर मोठी कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर यातील तीन जणांचा पत्ता कट झाला आहे. मस्साजोग सरंपच हत्या, खंडणी व मारहाण प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी करत आहे. सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी नियुक्त केली. यात स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह झोनवाल, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, सहायक फौजदार तुळशीराम जगताप, हवालदार मनोज वाघ यांचाही समावेश होता. विघ्नेसह काही कर्मचाऱ्यांचे कराडसोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अखेर एपीआय महेश विघ्ने, हवालदार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला एसआयटी मधून हटवण्यात आलं आहे.

डॉ. बसवराज तेली हे एमबीबीएस असून मूळचे बेळगावचे आहेत. ते २०१० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पहिल्यांचे त्यांची नियुक्ती जळगाव येथील पाचोरा येथे करण्यात आली. त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी काही काळ पुणे येथे शहर उपायुक्त म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांनी नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणून चांगलं काम केल्याचं सांगितलं जातं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon