माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना कीर्तीकर यांचे ८२व्या वर्षी निधन

Spread the love

माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना कीर्तीकर यांचे ८२व्या वर्षी निधन

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. मेघना गजानन कीर्तिकर यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारपणानंतर मेघना कीर्तिकर यांचे निधन झाले. रविवारी पहाटे ३.३० वाजता मेघना गजानन कीर्तिकर त्यांची प्राणज्योत मालवली. मागील अनेक दिवसांपासून मेघना गजानन कीर्तिकर या आजारी होत्या. त्यांच्यावर वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मेघना कीर्तिकर यांच्या जाण्याने गजानन किर्तीकर आणि त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मेघना कीर्तिकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी त्यांच्या गोरेगाव पूर्वमधील स्नेहदीप, पहाडी रोड नं. २ या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. यानंतर शिवधाम स्‍मशानभूमी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व) या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्‍यसंस्‍कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon