क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; चाकूने वार, मग डोक्यात घातला लोखंडी रॉड
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – कलाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. क्राइम पेट्रोल मालिकेच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या बातमीने सध्या एकच खळबळ उडवली आहे. हा अभिनेता क्राइम पेट्रोल फेम राघव तिवारी आहे. मुंबईतील वर्सोवा येथे त्याच्यावर हल्ला झाला. अभिनेता राघव तिवारी मित्रासोबत शॉपिंग करून घरी जात होता. रस्ता क्रॉस करताना अभिनेत्याची गाडी आरोपीच्या दुचाकीला धडकली. अभिनेत्याचीच चूक असल्यामुळे त्याने लगेच माफी मागितली. मात्र आरोपी अरेरावी आणि शिवीगाळ करू लागला.
अभिनेत्याने पुढे सांगितले की, आरोपीने रागात दुचाकीवरून उतरून त्याच्यावर हल्ला केला. त्याने दोन वेळा चाकूने हल्ला केला. लाथही मारली. आरोपीने त्याच्या गाडीच्या ट्रंकमधून दारूची बाटली आणि लोखंडी रॉड काढला. मग संरक्षणासाठी राघवने रस्त्यावर पडलेले लाकूड उचलले आणि आरोपीच्या हाताला मारले. यामुळे आरोपीच्या हातातील बाटली खाली पडली. पण त्याने हातातील रॉडने अभिनेत्याच्या डोक्यावर दोनदा हल्ला केला. यामुळे राघव गंभीर जखमी झाला. अभिनेत्याच्या मित्राने त्याला उपचारासाठी तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवले. उपचारानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अद्याप पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नसून आरोपी त्याच्या इमारतीच्या खाली फिरत आहे. जर कुटुंबाला काही झाले तर अभिनेत्याने चिंता व्यक्त केली.