शिव रुग्णालयात मद्यधुंद रुग्णाची महिला डॉक्टरला मारहाण; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Spread the love

शिव रुग्णालयात मद्यधुंद रुग्णाची महिला डॉक्टरला मारहाण; पोलिसांकडून गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबईत एका महिला डॉक्टरला मारहाण करण्यात आल्याची घटना सायन रुग्णालयात घडली आहे. मुंबईतील हे रुग्णालयात मुंबई महापालिकेतर्फे चालवण्यात येतं. मद्यधुंद अवस्थेत राडा करत एका रुग्णाने महिला डॉक्टरला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली अशी माहिती मार्डच्या डॉक्टरांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रुग्णाने मद्यधुंद अवस्थेत राडा घातला आणि एका महिला डॉक्टरला मारहाण केली. एक माणूस जखमी अवस्थेत लोकमान्य टिळक रुग्णालयात आला. त्याला गंभीर इजा झाली होती आणि त्याच्या जखमेला टाके टाकावे लागणार होते. इतर डॉक्टरांनी त्याला आधीच टाके टाकले होते आणि त्याच्या जखमेत अडकलेला कापूस डॉक्टर काढत होते. त्यावेळी या रुग्णाला वेदना होऊ लागल्या, त्याने डॉक्टरला जोरात ढकललं. या रुग्णाने मद्यपान केलं होतं, अशी माहितीही समोर आली आहे. आम्ही याबाबत अधिक माहिती घेत आहोत असं पोलिसांनी स्पष्ट केलं. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे. राज्य आरोग्य सेवा हिंसाचार प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon