तुमच्या बायकोचाही फोन लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू, नितेश राणेंची पोलिसांना धमकी

Spread the love

तुमच्या बायकोचाही फोन लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू, नितेश राणेंची पोलिसांना धमकी

पोलीस महानगर नेटवर्क

सांगली – भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना पुन्हा एकदा धमकी दिल्याचे समोर आले आहे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यामुळे हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका, असं नितेश नारायण राणे म्हणाले. हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू आले तर अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही, असं म्हणत नितेश राणे यांनी थेट पोलिसांनाच धमकी दिली आहे.

‘पोलीस खात्यातील काही अधिकाऱ्यांना सांगेल, सरकार हिंदुत्ववादी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. तुम्हाला जर तुमच्या पोस्टिंगवर मजा येत नसेल तर अशी मस्ती करा… तुम्हाला अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ की, बायकोचा फोनही लागणार नाही’, अशी थेट धमकीच नितेश राणेंनी पोलिसांना दिली.

लव्ह जिहादच्या प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना फैलावर घेत इशारा दिला आहे. सांगलीच्या पलूस येथे आयोजित शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मोर्चात बोलताना नितेश राणे यांनी हे विधान केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon