महाराष्ट्राच्या वाटेला ३ राष्ट्पती पदकं, १७ गॅलेंट्री मेडेल आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ३९ पदक जाहीर
पोलीस महानगर नेटवर्क
नवी दिल्ली – भारत देश उद्या ७७ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस पदकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशिष्ट सेवेसाठी महाराष्ट्राला ३ राष्ट्रपती पदक देण्यात येणार आहेत.
आयपीएस चिरंजीवी प्रसाद, राजेंद्र दहाले आणि एसीपी सतीश गोवेकर यांचा विशेष सेवेसाठी सन्मान करण्यात येणार आहे तसेच महाराष्ट्राला १७ गॅलेंट्री मेडेल आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ३९ पदक जाहीर झाली आहे. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील अतुलनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक :
चिरंजीव रामचबिला प्रसाद, अतिरिक्त पोलिस महासंचालक
राजेंद्र बालाजीराव दहाळे, संचालक
सतीश रघुवीर गोवेकर, सहायक आयुक्त
अग्निशमन दल
संतोष वारीक, मुख्य अग्निशमन अधिकारी, महाराष्ट्र
कारावास सेवा
अशोक ओलंबा, हवालदार
महाराष्ट्र पोलीस सेवेतील शौर्यतेसाठी राष्ट्रपती पदक :
कुणाल शंकर सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी
दीपक आवटे, पोलीस उपनिरीक्षक
कै. धनाजी होनमाने, पोलीस उपनिरीक्षक (मरणोपरांत)
नागेश कुमार एम. (नायक पोलीस शिपाई)
शकील युसूफ शेख (पोलीस शिपाई)
विश्वनाथ पेंदाम (पोलीस शिफाई)
विवेक नारोटे (पोलीस शिपाई)
मोरेश्वर पोटवी (पोलीस शिपाई)
कैलास कुलमथे (पोलीस शिपाई)
कोठला कोर्मी (पोलीस शिपाई)
कोर्के वेलडी (पोलीस शिपाई)
महादेव वानखडे (पोलीस शिपाई)
आयपीएस अनुज तारे (अतिरिक्त पोलिस अधिक्षक)
राहुल देव्हडे (पोलीस उपनिरीक्षक)
विजय सकपाळ (पोलीस उपनिरीक्षक)
महेश मिच्छा (हेड कॉन्स्टेबल)
समया असम (नायक पोलीस शिपाई)