धाराशिव हादरलं ! ४ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या ५२ वर्षीय नराधमाला जमावाकडून चोप
पोलीस महानगर नेटवर्क
धाराशिव – उमरगा शहरात एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. शहरातील एका गल्लीत आपल्या आईसोबत आजोळी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीला पैशाचे आमिष दाखवून एका परप्रांतीय ५२ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे लहान मुलीसुद्धा असुरक्षित नसल्याचे पुन्हा समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका गल्लीत आपल्या आईसोबत चार वर्षीय चिमुकली आजोळी आली होती. शनिवारी रात्री आई घरी स्वयंपाक करत असताना चिमुकली घराबाहेर भावंडांबरोबर खेळत होती. दरम्यान कर्नाटकातील अनिल देवेंद्र कांबळे रा बसवकल्याण (जि बिदर) याने चिमुकलीला पैशांचे आमिष दाखवून घराजवळून तिला खांद्यावर उचलून घेतले आणि कोरेगाव रोड लगत असलेल्या एका वेल्डींगच्या दुकाना समोरील लोखंडी टपरीच्या आडोशाला नेत बलात्कार केला. घडलेली घटना महिला व नागरिकांना समजताच चिमुकली सोबतचा पुढील मोठा अनर्थ टळला. तर या घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी संतप्त जमावाच्या मारहाणीत जखमी आरोपीला ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उमरगा पोलिसांत पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अनिल कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनुसया माने या करीत आहेत.