डोशाची ऑर्डर दुसऱ्या महिलेला आधी; ग्राहकाने रागाच्या भरात शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल
पोलीस महानगर न्यूज नेटवर्क
मुंबई – डोसा ऑर्डर वरून कांदिवली परिसरातील एका ग्राहकाला व त्याच्या साथीदारावर कारवाई होण्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोसा विक्रत्याने आपल्या आधी महिलेला पार्सल दिल्याने एका ग्राहकाला प्रचंड राग आल्याने त्याने महिलेशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केली. यामुळे प्रकरण चांगलेच तापल्याने आरोपी व त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. कांदिवली पूर्व परिसरात ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, आरोपी आणि त्याच्या मित्रावर पोक्सो कायदा व भा. द. वि. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना बुधवारी अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली येथील सेंट्रियम मॉलजवळील एका डोसा स्टॉलवर ही घटना घडली आहे. ३६ वर्षीय महिला आपल्या मुलीसह या स्टॉलवर डोसा खायला गेली होती. तिथे अनेक ग्राहक डोसा खात होते. महिलेने डोसाची पार्सल ऑर्डर दिली असता त्यानंतर डोसा विक्रेत्याने पार्सल दिले. परंतु तिथे असलेल्या एका व्यक्तीने त्या महिलेच्या आधी ऑर्डर दिली होती. परंतु आपल्याला ऑर्डर न देता महिलेला आधी ऑर्डर दिली याचा त्या व्यक्तीला प्रचंड राग आल्याने
रागाच्या भरात त्याने महिलेला शिवीगाळ केली. त्या व्यक्तीने डोसा विक्रेत्याला पण जाब विचारला. तू जाणून बूजून माझ्याआधी महिलेला डोसा दिला काय? असं त्याने विचारलं असता यानंतर महिलेनेदेखील त्याला उत्तर दिले. त्यामुळे त्यांच्यात थोडा वाद झाला. त्यानंतर त्या व्यक्तीने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, यामुळे सदर महिलेने घटनेची संपूर्ण माहिती महिलेने तिच्या घरच्यांना दिली. त्यानंतर महिलेचा दीर घटनास्थळी पोहोचल्यावर आरोपी आणि त्याच्या मित्राने महिलेच्या दीराला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली व अश्लील शिवीगाळ केली, असंही पोलिसांनी सांगितले. आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल व्हायला लागल्यावर आरोपी आणि त्याचे मित्र पसार झाले. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.