प्राध्यापक महिलेची दिड कोटींना ऑनलाईन चुना, सायबर भामट्याकडून पोलिस असल्याची बतावणी; गुन्हा दाखल
पोलीस महानगर न्यूज नेटवर्क
पुणे – राज्यात ठिकठिकाणी ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार सातत्याने होत आहेत. पोलिसांनी अनेकवेळा नागरिकांना आवाहन करून देखील नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. अशीच एक घटना पुण्याच्या औन्ध परिसरात घडली आहे. सायबर चोरट्याने पोलीस असल्याची बतावणी करून औंध येथील प्राध्यापक महिलेची तब्बल १ कोटी ५२ लाख ४५ हजार ७६० रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी ४३ वर्षीय प्राध्यापक महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार सायबर चोरट्याविरुद्ध फसवणुकीविरुद्ध आयटी ॲक्टसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सायबर चोरट्याने प्राध्यापक महिलेशी संपर्क करत पोलीस असल्याचे सांगितले तसेच तुमच्या आधारकार्ड चा वापर करुन बेकायदेशीर वापर सुरु असल्याचे सांगून फिर्यादी याना वेगवेगळ्या बँक खात्यात १ कोटी ५२ लाख ४५ हजार ७६० रुपये जमा करण्यास सांगितले, मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्याद मध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे करत आहेत.