डोंबिवलीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट, परिसरात धुरांचे प्रचंड लोट

Spread the love

डोंबिवलीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट, परिसरात धुरांचे प्रचंड लोट

योगेश पांडे – वार्ताहर 

डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीमधील फेज २ मधील अंबर केमिकल कंपनीत बॉलरलचा स्फोट झाला. या स्फोटानंतर धुरांचे मोठे लोट परिसरात पसरले. घटनास्थळी चार अग्नीशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. कंपनीजवळ ह्यूदांई कंपनीचे शोरुम आहे. या कंपनीपर्यंत ही आग पसरली आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु सहा ते सात कामगार जखमी झाले आहे. आगीची भीषणात पाहून उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे येथून अग्नीशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. डोंबिवली तापमान ४२ अंश सेल्सियस आहे. वाढत्या तापमानामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे. स्फोट झाल्यानंतर अनेक वस्तू हवेत उडाल्या. आगीची माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.

केमिकल कंपनीला लागलेली आग इतर ठिकाणी पसरत आहे. या स्फोटामुळे कंपनी शेजारी असलेल्या इमारतीच्या कामचा फुटल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon