संगमनेरमध्ये बनावट ताडीसाठी वापरणाऱ्या रसायनाचा मोठा साठा जप्त ; पुणे पोलिसांची कारवाई

Spread the love

संगमनेरमध्ये बनावट ताडीसाठी वापरणाऱ्या रसायनाचा मोठा साठा जप्त ; पुणे पोलिसांची कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – बनावट व रासायनिक ताडी बनवण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेट रसायनाचा कारखाना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने उध्वस्त केला आहे. गुन्हे शाखेने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका कारखान्यावर छापा टाकून हा कारखाना उद्धवस्त केला. या ठिकाणाहून तब्बल दोन हजार तीनशे किलो क्लोरल हायड्रेट पावडर जप्त केली आहे. याची बाजारात साठ लाख रुपये किंमत आहे. याशिवाय तेथून केमिकल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे जप्त केली आहेत. आश्चर्य म्हणजे सातवी पास व्यक्ती हा कारखाना चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे.

केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मेफेड्रोन ड्रग्स तस्करीचे आंतराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर पुणे पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई केली आहे. बनावट ताडी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल विक्री होत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे पोलिसांनी धडक कारवाई करण्याचं ठरवलं आणि थेट कारवाई केली. याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक कारखाना उद्ध्वस्त केला. या कारखान्यात क्लोरल हायड्रेट केमिकलपासून तयार केलेली ताडी प्यायल्याने आरोग्याच्या अती- गंभीर समस्या निर्माण होतात. प्रसंगी व्यक्तीचा मृत्यू देखील होवू शकतो. यामुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईचं कौतुक होत आहे.

ही कामगिरी सामाजिक सुरक्षा विभागाकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगाव, सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, सहायक पोलीस निरीक्षक बाबर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, सहायक फौजदार राजेंद्र कुमावत, पोलीस अंमलदार अजय राणे, बाबासाहेब कर्पे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, इरफान पठाण, ओंकार कुंभार, अमेश रसाळ, सागर केकाण, तसेच अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार संदीप जाधव, चेतन गायकवाड, शिवले, कांबळे शेख, दळवी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon