कियारा मनोज सिंग हिचा सुवर्ण विजय! १६व्या राष्ट्रीय कुडो स्पर्धेत कनिष्ठ गटात सुवर्णपदकाची कमाई
मुंबई : दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय इनडोअर स्टेडियम येथे सुरू असलेल्या १६व्या राष्ट्रीय कुडो स्पर्धा २०२५-२०२६ मध्ये कियारा मनोज सिंग हिने उज्ज्वल कामगिरी करत कनिष्ठ गटात सुवर्णपदक जिंकले.
देशभरातील नामांकित खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा असताना कियाराने उत्कृष्ट कौशल्य, वेग आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत विजेतेपद आपल्या नावे केले. तिच्या या यशाने महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.
कियाराच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, प्रशिक्षक आणि आयोजकांनीही तिच्या चिकाटीचे आणि परिश्रमाचे कौतुक केले आहे. कुडो क्षेत्रात तिच्याकडून भविष्यात आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.