नाशिकमध्ये क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत आरोपी जेरबंद

Spread the love

नाशिकमध्ये क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत आरोपी जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक – देशातआयपीएल फिवर सुरू आहे. आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटींग करणाऱ्या सराईत आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट -१ ने जेरबंद केले आहे. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटींग करणा-या इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्याचा सुचना दिल्या होत्या, त्यानुसार दि.२६ मार्च २०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आडगाव परिसरातील हॉटेल राजेशाही दरबार, औरंगाबादरोड, नांदुरनाका नाशिक या हॉटेलच्या पाठीमागे उघडयावर बसुन निशिकांत पगार नावाचा इसम हा सध्या चालु असलेल्या आयपीएल २०२४ च्या चैन्नई सुपर किंग विरुध्द गुजरात टायटन या क्रिकेट सामन्याचे त्याच्या मोबाईल फोनवर थेट प्रक्षेपण पाहून या खेळावर पैजा लावुन जुगार खेळुन स‌ट्टा चालवित आहे.

याबाबतची माहीती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळविली असता पथकाने हॉटेल राजेशाही दरबार, औरंगाबादरोड, नांदुरनाका नाशिक येथे सदर इसमास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. निशिकांत प्रभाकर पगार (वय ३७ वर्षे, रा-सदिच्छा नगर, इंदिरानगर नाशिक) यास पथकाने ताब्यात घेवुन त्याच्याकडून १८००० रुपये किंमतीचा बेटींग लावण्याकरीता वापरण्यात येणारा ०१ टॅब, ०२ मोबाईल असा मु‌द्देमाल हस्तगत करून सदर इसमाविरुध्द आडगाव पोलीस ठाण्यात सरकारतर्फे विशाल काठे यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल, पोलीस हवालदार: वाघमारे, विशाल काठे, प्रदिप म्हसदे, योगीराज गायकवाड, पोलीस नाईक: प्रशांत मरकड, विशाल देवरे, पोलीस अंमलदार: अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे नाझीमखान पठाण यांच्य पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon