भिवंडीत महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीला पोलीसांकडून बेड्या

Spread the love

भिवंडीत महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीला पोलीसांकडून बेड्या

पोलीस महानगर नेटवर्क

भिवंडी – भिवंडीतील धामणकरनाका परिसरात राहणाऱ्या महिलेला कौटुंबिक वादातून तिच्या पतीने धारदार चाकूने बरगड्यावर वार करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीला भोईवाडा पोलीसांनी पकडून गजाआड केले. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
या बाबत सविस्तर वृत्त दि. २५/०३/२०२४ रोजी सायंकाळी ०४.०० वा. सुमारास पीडित महिला (वय ४०) रा. राजस्थान अपार्टमेंटच्या बाजूला, धामणकरनाका, भिवंडी येथे तिचा पती मुस्ताक अहमद झाकीर अन्सारी (वय ४६) याच्यात कौटुंबिक कारणावरून भांडण होऊन त्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या बरगडीवर धारदार चाकूने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.जखमी महिलेस वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर प्रकाराबाबत फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरूध्द गुन्हा रजि. नं.| ३३०/२०२४, भा.द. वि.कलम ३०७, ३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीस अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास भोईवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हात्रे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon