अमली पदार्थ तयार करून विकणाऱ्या आरोपींना अमली पदार्थ विरोधी पथकाने केली अटक
विवेक मौर्या
ठाणे – अमली पदार्थाची निर्मिती करून, तो विकणाऱ्या आठ आरोपींना ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्या कडून 26 ग्रॅम एमडी व 4 किलो 850 ग्रॅम चरस व ते बनवायचे साहित्य, केमिकल असा मिळून असा मिळून 55,73,000/- रुपये किंमतीचा अंमली पदार्थ, 59,000 रुपयांचे अंमली पदार्थाचे साहित्य, 27,00000/- रुपयांची गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त केली असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे अंमली विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे व त्यांच्या पथकाने 28/12/2023 रोजी जयेश कांबळी उर्फ गोलु वय 25 वर्ष राहणार आंबेडकर रोड, व विघ्नेश शिर्के वय 28 वर्ष राहणार वर्तकनगर यांना 78.8 ग्रॅमएमडी सह पकडले होते, त्यांच्या कडे कौशल्याने तपास करून त्यांना एमडी पुरवणाऱ्या अहमद शफी, राहणार कुर्ला, शब्बीर अब्दुल करीम शेख राहणार कुर्ला यांना पालघर येथून अटक करण्यात आली, त्या वेळी त्यांच्या कडून 26 ग्रॅम एमडी आणि 4 किलो 850 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला, त्यांना अंमली पदार्थ पूरवीणाऱ्या मोहम्मद रहानीफ अन्सारी राहणार कुर्ला यास चंदनसार रोड कोपरी विरार येथून 18/01/2024 रोजी अटक करण्यात आली, त्याने मुंबई येथे राहणारा आमिर खान हा अंमली पदार्थ पूरवित असल्याबाबत माहिती दिली, त्याला 29/01/2024 रोजी अटक करण्यात आली, त्याने आपल्या ओळखीचा मनोज पाटील उर्फ बाळा हा अंमली पदार्थ पूरवित असल्याचे सांगुन तो यापूर्वी गुजरात राज्यात एमडी या अंमली पदार्थाच्या तस्करीत अटक असल्याचे सांगितले, त्याची अधिक माहिती घेतली असता, तो गुजरात येथील जेल मध्ये असताना मार्च 23 मध्ये पॅरोलवार आल्यावर परत कारागृहात न जाता पळून गेला होता, तसेच मनोज पाटील हा कुठल्याही प्रकारे मोबाईल कॉल न करता इंटरनेट डोंगलचा वापर करून व्हाट्सअप कॉलद्वारे संपर्क करीत असल्याने तसेच तो सतत त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने तो सापडत नव्हता, पण पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तांत्रिक तपास करून मनोज उर्फ बाळा लक्ष्मण पाटील वय 45 वर्ष राहणार पेण जिल्हा रायगड यास दिनांक 6/02/2024 रोजी खालापूर येथून अटक केली, त्या नंतर त्याचा साथीदार दिनेश म्हात्रे वय 38 याला अटक करण्यात आली, त्यांची चौकशी केली असता त्या दोघांनी मिळून पेण येथील कलद गाव येथे एक फार्महाऊस घेतले होते, तेथे जून 2023 ते नोव्हेंबर 2023 या दरम्यान त्यानी एमडीची निर्मिती करून विक्री केली होती, दरम्यान सदर फार्म हाऊसचे मालकास संशय आल्याने त्यांनी तेथून एमडी पदार्थ बनविण्याचे हलवून तळोजा येथे नेऊन ठेवले, व तेथे एमडी बनवण्यास सुरुवात केली, तेथे त्यांनी 21,00,000/- लाख रुपयांचे 210 ग्रॅम एमडी बनवले, पोलिसांनी ते सर्व जप्त केले, ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, जगदीश गावीत, पोलीस उप निरीक्षक दीपेश केणी व त्यांच्या पथकाने केली.