एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

Spread the love

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

मुंबई – एकेकाळी अंडरवर्ल्डमधील गुंडांचा कर्दनकाळ अशी ओळख असणारे एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर खात्याकडून धाड टाकण्यात आली आहे. आज सकाळी आयकर खात्याचे अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पवई येथील निवासस्थानी दाखल झाले. तेव्हापासून शर्मा यांच्या घरी आयकर अधिकाऱ्यांची झाडाझडती सुरु आहे. या तपासादरम्यान घरातच प्रदीप शर्मा यांचे आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांशी भांडण झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आयकर खात्याने मदतीसाठी मुंबई पोलिसांना पाचारण केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा हे माजी राजकारणी आणि नोकरशहा यांच्याशी जोडलेले आहेत, त्यांचीही करचुकवेगिरीप्रकरणी चौकशी सुरू आहे. शर्मा यांच्या निवासस्थानाव्यतिरिक्त इतर काही राज्यांमध्ये काही ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या शर्मा यांना याआधी मनसुख हिरण हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. शर्मा हे अँटिलिया स्फोटक प्लांट प्रकरणातील आरोपी आहेत, ज्यामध्ये मनसुख हिरेनच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर मुंबई महानगर प्रदेशातील विरारमधून आमदारकीची निवडणूक लढवली होती, मात्र निवृत्तीनंतर निवडणुकीत त्यांचा पराभव झाला हो Meता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon