तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लेखाधिकारी निघाला लाचखोर; ६ लाखांची लाच घेतांना अटक

Spread the love

तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लेखाधिकारी निघाला लाचखोर; ६ लाखांची लाच घेतांना अटक

धाराशिव : छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत विभागाने धाराशिव जिल्ह्यात मोठी कारवाई केली असून, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे वित्त व लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे याला सुमारे ६ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयातील स्वतःच्या केबिनमध्ये बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांना लाच घेतांना पकडण्यात आले आहेत ३ कोटी ८८ लाखांच्या कामापैकी थकलेले १ कोटी ८८ लाखांचे बिल मंजुरीसाठी शिंदे याने १० लाख रुपये मागितले होते. तडजोडीअंती ६ लाख रुपये घेतांना त्याला ताब्यात घेण्यात आले.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित सैनिक स्कूलच्या प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजला, प्रवेशद्वार व संरक्षक भिंत बांधकामाचा सुमारे ३ काेटी ८८ लाखांचा ठेका तक्रारदारास मिळाला हाेता. हे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले आहे. पूर्ण झालेल्या या बांधकामाचे आजवर २ काेटी रूपयांपेक्षा जास्तीची बिले तपासणी करुन मंजुरीसाठी पाठवून मिळवून दिले व उर्वरित बिल तपासणी करुन मंजुरीस पाठविण्यासाठी संस्थानचे वित्त व लेखाधिकारी सिध्देश्वर मधुकर शिंदे यांनी ठेकेदाराकडे पंचासमक्ष सुमारे १० लाखांची मागणी केली हाेती. तडजाेडीअंती ६ लाख रूपये स्वीकारण्याचे मान्य केले. लाचलुचपत प्रतिबंध विभाग पोलिस अधीक्षक संदीप आटोळे व अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलिस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, आशीष पाटील यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon