झुमका वाली पोरं फेम’ अभिनेत्यावर गुन्हा दाखल

Spread the love

झुमका वाली पोरं फेम’ अभिनेत्यावर गुन्हा दाखल

नाशिक – ‘हाई झुमका वाली पोरं…। या अहिराशी भाषेतील खान्देशी गाण्याने यु-ट्यूबवर मागील वर्षी  प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आजही या गाण्याचं वेडं तरुणांना आहेच,या गीतामधील अभिनेता विनोद उर्फ सचिन अशोक कुमावत विरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक व अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खान्देशी अभीनेता सचिन कुमावत विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने अहिराणी भाषेतील ‘हाई झुमका वाली पोरं…। पुन्हा चर्चेत आलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,यु-ट्यूब चॅनलद्वारे गीते प्रसारित करत पीडितेसोबत ओळख वाढवून याने ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून मागील पाच महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात शारीरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सातपूर येथील म्हाडा कॉलनीत राहणारा संशयित विनोद उर्फ सचिन कुमावत याचे शूटिंगदरम्यान पीडितेसोबत झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. कुमावत याने लग्नाचे आमिष दाखवून ३० ऑगस्ट २०२२ ते १७ जानेवारी २०२३ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी पीडित युवतीला घेऊन जात शारीरिक अत्याचार केले. तसेच पीडित युवतीने लग्नाबाबत विचारणा केली असता तिला शिवीगाळ करून मारहाण करत लग्नास नकार दिला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित कुमावत विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी नाशिकरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon