अंमली पदार्थ विकणाऱ्या इसमास अटक, २२ किलो गांजा हस्तगत ; मुंब्रा पोलिसांची दमदार कामगिरी
हुसैन शेख
ठाणे – मुंब्रा शहरात अमली पदार्थ बाहेरून आणून मुंब्रामध्ये विकण्याचा धंदा जोमाने सुरू आहे, असाच एक अमली पदार्थ विक्रेत्याला मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे, दि. ०१/०२/२०२४ रोजी एन. डी. पी. एस. पथकातील पो. उपनि. नितिन भोसले नेमणूक मु्ंब्रा पोलीस ठाणे यांना आपल्या गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, दिवा चौक, जयेश वाईन शॉप समोर दिवा, मुंब्रा येथे एक इसम गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्याकरिता येणार आहे.
मिळालेली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हटकर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे दिवा चौक येथील जयेश वाईन शॉप जवळ सापळा रचण्यात आला असता रात्री ९ वा.च्या सुमारास सदर ठिकाणी हुंडाई कार मधुन गांजा विक्रीसाठी आलेला इसम रहमत खान तमिझ खान (३३) रा. गॅलेक्सी अपार्टमेंट, रू. नं. ०७, अलमास कॉलनी, सैनिक नगर, मुंब्रा.ता. जि.ठाणे तर मूळ पत्ता. लाल खडी, उमर मस्जिदच्या जवळ, अमरावती यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याचेकडील हुंडाई कार क्र. एमएच ०५ डी.के. २४९७ या मधुन २२ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याच्याकडील २,७५,०००/- रू. किमतीचा २२ किलो गांजा,२,००,००)/- रू. किमतीची हुंडाई कार व ३०,०००/- रू. किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण ५,०५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस चौकशीत आरोपीने सदरचा २२ किलो गांजा त्याने मोहम्मद सादिक रा. रहिमात नगर, ता.धारणी. जि.अमरावती याच्याकडून आणला असल्याचे सांगितले आहे. याबाबत मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक. ५०९/२०२४ एन. डी. पी. एस. एक्ट कलम ८(क), २०(क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.