२५ हजाराची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
नाशिक –सातबारा उताऱ्यावरील नोंद प्रमाणित करण्यासाठी २५ हजाराची लाच घेतांना येवला तालुक्यातील राजापूर येथील मंडळ अधिकारी मनोहर अनिल राठोड (३३) हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकले. पंचांसमक्ष २५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम पंचांसमक्ष येवला येथे स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलेले आहे. .
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी असून त्यांनी विकत घेतलेल्या राजापूर येथील गट क्रमांक १४२/२/ब येथील २५ गुंठे जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर येवला तालुक्यातील मौजे राजापूर तलाठी यांनी दिनांक ४/१/२४ रोजी तक्रारदार यांच्या मालकी हककाबाबत नोंद घेतली होती. व मंडळ अधिकारी या नात्याने ती नोंद प्रमाणित करण्यासाठी राजापूर मंडळ अधिकारी राठोड यांनी तक्रारदार यांचेकडे पंचांसमक्ष २५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम पंचांसमक्ष येवला येथे स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे. सदर कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस हवालदार प्रभाकर गवळी व पोलीस शिपाई संजय ठाकरे यांच्या पथकाने केली,.