कल्याणमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मनोज राय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
कल्याण – कल्याणच्या माजी नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज राय असे या भाजपच्या माजी नगरसेवक नाव असून त्याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. माजी नगरसेवक मनोज राय यांनी लग्नाचे आमिष दाखवून पिडीत महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. पीडित महिलेने लग्नासाठी तगादा लावल्याने तिला त्रास देण्यात आला. मनोज राय यांच्या त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मनोज राय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबत पुढील तपास करीत आहेत.