पाच लाखाची लाच मागणा-या सहनिबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी व वरिष्ठ लिपीकाविरुध्द गुन्हा दाखल
नाशिक – घर लिलाव विक्रीचा आदेशाविरुद्ध निकाल बाजूने देण्यासाठी पाच लाखाची लाच मागणा-या विभागीय सहनिबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी भिमराव यशवंत जाधव (४५) व वरिष्ठ लिपीक अनिल नथ्थुजी (५२) यांच्याविरुध्द मुंबई नाका पोलिस स्टेशन, नाशिक शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे को- ऑप क्रेडिट सोसायटी चे क्लार्क असून सोसायटीचे नियमानुसार सभासद यांनी कर्ज भरले नाही म्हणून सभासद यांचे घर लिलाव विक्रीचा आदेशाविरुद्ध विभागीय सहनिबंधक कार्यालय,नाशिक येथे सभासद यांनी रिव्हिजन दाखल केली असून सदर प्रकरणाची चौकशी सदर कार्यालयात सुरू होती. सदर कार्यवाहीचा निकाल तक्रारदार यांच्या को- ऑप क्रेडिट सोसायटीचे बाजूने देण्यासाठी आरोपी क्रमांक १ व २ यांनी तक्रारदार कडे ६ लाख रुपयाची मागणी केली तसेच ७ डिसेंबर व ८ डिसेंबर २०२३ रोजीचा पडताळणी कारवाईत तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती ५ लाख रुपये लाचेची मागणी केली म्हणुन आरोपी क्रमांक १ व २ यांचेवर मुंबई नाका पोलिस स्टेशन, नाशिक शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पोलीस निरीक्षक निलिमा केशव डोळस,पोलीस नाईक संदीप हांडगे, सुरेश चव्हाण व त्यांच्या पथकाने केली.