मुंबईत पुन्हा ड्रग्ज तस्करी; दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

मुंबईत पुन्हा ड्रग्ज तस्करी; दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई – मुंबईतील मालवणी पोलिसांच्या पथकाने ड्रग्ज तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना अमली पदार्थासह एक व्यक्ती सापडला. त्याच्याजवळ १ ग्रॅम ड्रग्ज आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता आरोपीचे नाव इब्राहिम शेख असल्याचे समजले. तो ड्रग्जचा पुरवठा करीत माहिती पोलिसांनी मिळाली होती त्यावरून चौकशी केली असता एका घरावर पोलिसांनी धाड टाकली.

ड्रग्ज बनवण्याचे संपूर्ण साहित्य त्या ठिकाणी आढळून आले. त्या ठिकाणी एक व्यक्ती पोलिसांना रंगेहाथअसून त्या व्यक्तीचे नाव नूर आलम मोहम्मद आलम चौधरी असे आहे. धाडीत ५०० ग्राम पेक्षा जास्त ड्रग्ज तेथे आढळून आले. ज्याची किंमत १ कोटींहून अधिक आहे. त्या ठिकाणी काही अर्धवट साहित्य देखील आढळून आले आहे. या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेऊन पुढीस तपास मालवणी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon