घरफोडी करणाऱ्यास अटक; लाखाचा मुद्देमाल ही हस्तगत
प्रकाश संकपाळ
डोंबिवली – घरफोडी करणाऱ्यास डोंबिवली पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडील लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आकाश केदारे असे अटक व्यक्तीचे नाव असून त्याने डोंबिवली पूर्व येथील आयरेगावातील एका घरातून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल मिळून असा एकूण १,२०,५००/-रु किमतीचा मुद्देमालावर चोरट्याने हात साफ केला होता. त्याच्यावर डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.क्रं.४६१/२०२३ कलम ३८०भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी गुप्त माहीतीच्या आधारे तपास करून आयरेगावातील ज्योतीनगर मधून आकाश केदारे यास ताब्यात घेऊन चौकशीअंती अटक करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी एकूण १,१०,५००/- रु.किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनील कुराडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते व पोलीस निरीक्षक (गुन्हे) खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरणं पथकाचे सपोनि योगेश सानप व त्याच्या सहकारयांनी केली.