उबेर चालकाकडून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला लुटनण्याचा प्रयत्न; वाद वाढला, अनर्थ घडला आणि विद्यार्थ्यानेच केली चालकाची हत्या

Spread the love

उबेर चालकाकडून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला लुटनण्याचा प्रयत्न; वाद वाढला, अनर्थ घडला आणि विद्यार्थ्यानेच केली चालकाची हत्या

योगेश पांडे / वार्ताहर

टिटवाळा – टिटवाळ्यामध्ये रक्ताने माखलेली कार आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या कारचा चालक बेपत्ता असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. आता या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या गाडीच्या चालकाचा मृतदेह सापडला असून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही गाडी बुक करणाऱ्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानेच चालकाची हत्या केल्याचं समोर आले आहे. उबेर चालकाने रस्त्यात कार थांबवुन त्याला लुटण्याचा प्रयत्न केला, याच झटापटीत विद्यार्थ्याच्या हातून चालकाचा गळा चिरला गेला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार टिटवाळा येथील गोवेली रोडवर रक्ताच्या दागाने माखलेली एक उबेर कार आढळून आली होती. टिटवाळा पोलिस या प्रकरणाचा तपास करीत होते. नक्की या गाडीचा चालक कुठे आहे? त्याच्यासोबत काय घडले आहे? याचा तपास पोलिसांनी सुरु केला. टिटवाळा पोलीलांसह ठाणे एलसीबी देखील तपास करीत आहे. ठाणे एलबीसीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांच्या पथकाने हा तपास सुरु केला.

पोलिस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांच्या पथकाने उबेर कंपनीची ही कार असल्याने राेड मॅप आणि शेवटचा प्रवासी कोण आहे? याचा शोध लावला. तपासात पोलिसांना माहिती मिळाली की आदर्श भालेराव नावाच्या व्यक्तीने ही गाडी पुण्याला जाण्यासाठी बुक केली होती. आदर्श हा इंजिनिरिंगच्या द्वितीय वर्षाला आहे तो त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पुण्याला निघाला होता. त्यासाठी उबेर कार बुक केली. गाडी चालक नासीर अन्सारी आला. त्याने प्रवासी आदर्शला घेऊन पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला.गाडी गणेश खिंडीजवळ आली असता चालक नासीर याने गाडी थांबविली. नासीरने चाकूचा धाक दाखवून आदर्शकडे पैशाची मागणी केली. तुझ्याकडे असलेले पैसे दे, असं तो म्हणाला. यावेळी आदर्शने प्रतिकार केला. त्यांच्यात जोरदार झटापट झाली. या झटापटीत नाशीरच्या हातीतील चाकू आदर्शच्या हाती आला. तो नासीरच्या गळ्याला लागल्याने नासीरचा गळा चिरला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

नासीरचा मृतदेह तिथेच टाकून आदर्शने उबेर गाडी टिटवाळ्याला आणली. गाडी टिटवाळा गोवेली रस्त्यावर टाकून पळून गेला. पोलिस तपास हे उघड झाले की, नासीरला पैशाची गरज होती. त्याने चार पाच जणांकडून पैसे मागितले होते. आदर्शचा नासीरची हत्या करण्याचा हेतू नव्हता. मात्र हा गुन्हा घडला. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. या प्रकरणी ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon