ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा उन्माद, मार्शने विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेऊन काढला फोटो
अहमदाबाद – सुमारे दीड महिना चाललेल्या क्रिकेट विश्वचषक सामन्याचा रविवारी अंतिम सामना झाला. विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विश्वचषक सहाव्यांदा जिंकले. विश्वचषक स्वीकारल्यानंतर काहीच तासात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिचेल मार्श याने हॉटेलमध्ये सोफ्यावर बसून आपले पाय विश्वचषकावर ठेवल्याचा फोटो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट केला. या फोटोवरून ऑस्ट्रेलियाच्या संघावर नेटकरी प्रचंड रोष व्यक्त करीत आहेत.विश्वचषकावर पाय ठेऊन काढलेला हा फोटो मार्शने स्वत:च्या हन्डेलवरून रीपोस्ट केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे क्रिकेट संबधित आणखी एक गैरवर्तन पुढे आले.त्यावर विविध स्तरातून जोरदार टीका होताना दिसत आहे.सहाव्यांदा विश्वचषक जिंकल्याने त्यांना विश्वचषकाची कदर नसल्याचे बोलले जात आहे.ऑस्ट्रेलियन खेळाडू हे त्या विश्वचषकाचा सन्मान कायम राखण्यात अपयशी ठरले असल्याची टीका त्यांच्यावर समाज माध्यमांद्वारे होत आहे.क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशाच्या संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न असते. यापैकी मोजक्याच संघांना विश्वचषक खेळण्याची संधी प्राप्त होते. त्यातही प्रयत्नांची पराकाष्ठा करत काही संघ उपांत्य फेरीत पोहचतात. त्यात विजय मिळवला तर त्यांना विश्वचषक जिंकण्यासाठी अंतिम सामन्यात सर्व स्तरावर अव्वल ठरावे लागते. तेव्हा कुठे विश्वचषक पदरी पडतो.
या सर्व परिस्थितीतून गेल्याने त्या विश्वचषकाचे मोल विजेत्या संघास तर असतेच, पण ज्यांनी विश्वचषक जिंकण्यासाठी प्राण पणाला लाऊन खेळले आणि त्यांच्या पदरी अपयश आले.त्यांना या विश्वचषकाची किंमत अधिक वाटते. या संघांपेक्षा जगभरातून अब्जावधी चाहते या विश्वचषक स्पर्धेकडे डोळ्यात तेल टाकून पाहत असतात.त्यांच्या भावना या चषकासोबत जोडलेल्या असतात. आपण खेळाडू आहोत, आपल्या कारकिर्दीत आपल्या देशाला विश्वचषक जिंकून देण्याचे स्वप्न प्रत्येक देशाच्या खेळाडूंचे असते.अशा या अमुल्य चषकाला पायदळी तुडवून चषकासह अब्जावधी चाहत्यांचा खेळ भावनेचा अपमान करणाऱ्या ऑस्ट्रेलियन मस्तवाल खेळाडूंवर चषकाचा आणि खेळ भावनेचा अनादर केल्याच्या भावना जगभरातून व्यक्त होताना दिसत आहेत.