देह व्यापाराचे मोठे रॅकेट उध्वस्त, पाच दलालांना अटक. सात बांगलादेशी मुलींची सुटका
दिनेश जाधव : डोंबिवली
कुणाला उपचार तर कुणाला नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या पाच दलालांना अटक करत सात मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. फ्रीडम फर्म या संस्थेच्या मदतीने ठाणे अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग सेल आणि मानपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे बांग्लादेश मधून मुलींना आणून वेश्याव्यवसाय ढकलणारा दलालांचा म्होरक्या युनूस शेख उर्फ राणाला देखील अटक करण्यात आली आहे. पुण्यातील फ्रीडम फर्म ही संस्था महिला व मुलीची देह व्यापारातून सुटका करत त्यांचे पुनर्वसन करते. ५ ऑक्टोबर रोजी या संस्थेच्या कार्यालयात बांग्लादेश हून एक ईमेल आला. या ईमेल मध्ये एका १९ वर्षाच्या मुलीला नोकरी लावण्याचा बहान्याने बांग्लादेश हून भारतात आणले असून ती मुलगी सध्या कुठे आहे याची माहिती देण्यात आली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून संस्थेच्या पदाधिकारी शिल्पा वानखेडे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पुण्याहून ठाणे गाठले. त्यांच्यासोबत रेश्मा तुपकर, आयोजक पुरोहित हे त्यांचे सहकारी होते. ठाण्याला येऊन त्यांनी ठाण्यात अँटी ह्यूमन ट्राफिकिंग सेलच्या अधिकाऱ्यांची भेट घेत सदर माहिती त्यांना दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, महि पोलीस अधिकारी चव्हाण यांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आह. डोंबिवलीतील हेदूटणे गावाजवळ पोलिसांनी छापा टाकला. या वेळी सेलच्या अधिकाऱ्यांसोबत मानपाडा पोलीस देखील या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली. तपासा दरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. या सातही महिलांना बांग्लादेश मधून नोकरी देण्याचे आमिष दाखवून तर कुणाला उपचाराचे आमिष दाखवून भारतात आणण्यात आलं होतं. या मुलींसोबत लैंगिक अत्याचार करण्यात आला त्यानंतर या मुलींना जबरदस्तीने देहव्यापारात ढकलण्यात आलं. देह व्यापारास नकार देणाऱ्या मुलींना मारहाण देखील केली जात होती. पोलिसांनी या पाचही दलालांना बेड्या ठोकल्या आहेत. या पाच जणांचा म्होरक्या युनूस शेख उर्फ राणा आहे. यासोबतच साहिल शेख, फिरदोस सरदार, आयुब शेख, बीपलॉप खान अशी युनूसच्या अटक साथीदारांची नावे आहेत.