गोंदियातील अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन मध्य प्रदेशात अत्याचार; मुस्लिम तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Spread the love

गोंदियातील अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन मध्य प्रदेशात अत्याचार; मुस्लिम तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

गोंदिया – गोंदियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका मुस्लिम तरुणावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली आहे. पोलीस निरीक्षकांना निवेदन देत कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

गोंदियाच्या रामनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका मुस्लिम तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीने पीडित मुलीला मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्याची माहिती पीडित मुलीने आपल्या वडिलांना दिली होती. त्यानंतर वडिलांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. आरोपीच्या विरोधात पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले आहे. या प्रकरणानंतर सकल हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून बुधवारी शेकडो हिंदू समाज बांधवांनी पोलीस स्टेशन रामनगर चे पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांची भेट घेत या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा विश्व हिंदू परिषद तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon