मालाडमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार; सिलेंडरचा साठा जप्त करत १३ जणांविरूद्ध गुन्हे दाखल

Spread the love

मालाडमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार; सिलेंडरचा साठा जप्त करत १३ जणांविरूद्ध गुन्हे दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या अमेरिका–इस्त्रायल–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि मुंबईत गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्यामुळे मुंबईतील खाऊगल्ल्या बंद पडल्या आहेत. चौका चौकात लागणारे वडा पाव स्टॉल बंद झाले आहेत. त्याचसोबत सर्वसामान्य नागरीक गॅससाठी एजन्सीबाहेर लांबच लांबा रांगा लावत आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेऊन एका टोळीने गॅसचा काळाबाजार सूरू केला होता. या घटनेची माहिती मालाड पोलिसांना मिळताच त्यांनी धडक कारवाई करत १३ जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्याचसोबत आरोपींकडून गॅस सिलेंडरचा साठाही जप्त करण्यात आला आहे.

मुंबईत झालेल्या गॅस तुटवड्यामुळे छोट्या छोट्या स्टॉल वाल्यांचे आणि मुंबईकरांचे मोठे हाल झाले आहेत. मुंबईकर गॅससाठी तासनतास एजन्सीबाहेर रांगा लावत आहेत.तर गॅस तुटवड्यामुळे मुंबईतले छोटे छोटे स्टॉल आणि खाऊगल्ल्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. काही प्रमाणात या गोष्टीचा फायदा हॉटेल मालकांना बसला आहे.त्यामुळे त्यांनी देखील हॉटेल बंद केले आहेत. गॅसची अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यात गॅस बुकींग संदर्भातही नियम बदलण्यात आले होते. शहरी भागात २५ तर ग्रामीण भागात ४५ दिवसात गॅस वितरण करण्याचे नियम लागु करण्यात आले होते.त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांची धाकधुक वाढली होती. तसेच गॅस तुटवड्याच्या भितीने अनेकांनी एजन्सीबाहेर रांगा लावायला सूरूवात केली होती. या गोष्टीचा फायदा घेऊन मालाडमध्ये एक टोळी सक्रिय झाली आणि ती ब्लॅकने दुप्पट किंमतीत सिलेंडर विकायची आणि काळाबाजार करायची.

या घटनेची माहिती मालाड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड करण्यात आला आहे. तसेच १३ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केले आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडून सुमारे १२ व्यावसायिक व घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon