शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्या भाजपविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वादाची ठिणगी; थेट मारामारीची भाषा
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – गीतेत सांगितल्या प्रमाणे युद्धात शत्रू असतो. तो भाऊ असला तरी त्याला मारल्या शिवाय विजय भेटू शकत नाही. त्याच पद्धतीने युतीचा उमेदवार समोर का असो ना, आम्हाला त्याला गारद करुन शिवसेनेचे पॅनल निवडून आणायचे आहे. असे विधान कल्याणमधील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. कल्याण डोंबिवलीत महायुतीमध्ये विष कालवण्याचे काम अरविंद मोरे यांनीच केले आहे असा पलटवार भाजप तर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे शिवाय राम कोण आणि औरंगजेब कोण यावर ही भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीपर्यंत हा वाद आणखी टोकाला जाणाऱ्याची शक्यता आहे.
राज्य मिळविण्यासाठी भावाने भावाला मारले पाहिजे ही विचारधारा त्यांची आहे असं भाजप नेते दया गायकवाड यांनी सांगितलं. आमचा पक्ष श्रीरामाला मानणारा आहे. भरताला राज्य मिळावे म्हणून श्रीरामाने वनवास सोसला. परंतू त्यांची विचारधारा ही औरंगजेबाची आहे असा पलटवार भााजपचे दया गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे कल्याणच्या राजकारणात अचानक श्रीराम आणि औरंगजेबाची एन्ट्री झाली आहे. कल्याण डोंबिवलीत पक्ष प्रवेशावरुन भाजप आणि सेनेत चांगलाच वादंग झाला. डोंबिवलीतील आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण एकत्र आल्यावर महायुतीमधील वाद मिटल्याचं सांगण्यात आलं. मात्र असं काही ही झालं नाही हे ताज्या उदाहरणावरून दिसून येतं.
पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वादाची ठिणगी पडली आहे. आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर २०१४ सालची निवडणूक लढविली गेली. नंतर मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणीस झाले. पॅनल क्रमांक २ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. भाजपला एकही जागा सोडणार नाही. राज्य मिळविण्यासाठी समोरचा शत्रू भाऊ आसला तरी त्याला मारल्या शिवाय विजय भेटत नाही. युतीतील उमेदवाराला गारद करुन शिवसेनेचे पॅनल निवडून आणणार असे विधान मोरे यांनी केले.मोरे यांच्या या विधानानंतर भाजपने पलटवार केला आहे. या बाबत भाजपचे माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.
ते म्हणाले अरविंद मोरे हेच महायुतीत विष पेरणारे आहे. कल्याण डोंबिवलीत महायुतीत जे काही मतभेद झाले, त्याला खरे तर मोरेच जबाबदार आहेत असा आरोप त्यांनी केला. महायुतीचा निर्णय हा वरिष्ठ नेते घेतात. अरविंद मोरे आणि आमच्या सारखा कार्यकर्ता महायुतीचा निर्णय घेऊ शकत नाही. त्यांनी राज्य जिंकण्यासाठी समोरचा शत्रू हा भाऊ असला तरी त्याला मारल्याशिवाय विजय भेटू शकत नाही असे म्हटले. ही भाषा आमची नाही. ही विचारधारा आमची नाही. आमची विचारधारा श्रीरामाला मानणारी आहे. श्रीरामांनी भरत यांना राज्य मिळावे त्यासाठी वनवास भोगला. भावाला मारुन राज्य मिळविणारे हे औरंगजेबाच्या विचाराचे आहे असा हल्लाबोलच त्यांनी केला.