दिग्गजांना मागे टाकत आयएएस राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव; सरकारचा मोठा निर्णय
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. अनेक दिग्गज वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागे टाकत अग्रवाल यांनी हा सर्वात महत्त्वाचा प्रशासनिक पदभार स्वीकारला आहे.
राज्य प्रशासनातील कर्तृत्व, दीर्घ अनुभव आणि विविध विभागांतील यशस्वी कार्यकाळ लक्षात घेऊन मंत्रिमंडळाने ही निवड केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर संपूर्ण मंत्रालय आणि प्रशासकीय यंत्रणेत उत्सुकता आणि चर्चेला उधाण आले आहे.
राजेश अग्रवाल यांच्याकडे यापूर्वी वित्त, उद्योग, माहिती-तंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी होती. धोरणात्मक कामकाजात त्यांचा हातखंडा असल्याने आगामी काळात राज्य प्रशासन अधिक वेगाने काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नव्या मुख्य सचिवांकडून राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी गतीमान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय राज्याच्या प्रशासकीय रचनेत मोठा बदल मानला जात आहे.