गुजरातमधील वापी येथे अपहरित १६ वर्षीय मुलगी ठाणे गुन्हे शाखेच्या AHTU कडून सुरक्षितरित्या शोधून काढली
विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आलेल्या अपहरणप्रकरणातील १६ वर्षीय मुलगी किरण हिला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांनी समांतर तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने गुजरातमधील वापी, जि. वलसाड येथून सुरक्षितरीत्या शोधून काढले.
या यशस्वी कारवाईत पो.उप.नि. स्नेहल शिंदे, पोहवा २२६/पाटील आणि मपोअं/२१७ थोरात यांनी योग्य समन्वय साधत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शोधलेली मुलगी पुढील कार्यवाहीसाठी विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनच्या ताब्यात सुपूर्त करण्यात आली आहे.
ठाणे पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध असल्याचा पुनश्च निर्वाळा या कारवाईतून मिळाला आहे.