तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीदरम्यान राडा

Spread the love

तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणात
पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीदरम्यान राडा

योगेश पांडे / वार्ताहर

धाराशिव – तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. यामध्ये काही पुजाऱ्यांची नावे आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. तुळजापूरमध्ये मोठे ड्रग्ज रॅकेट सुरू होते. शेवटी याची भनक पोलिसांना लागली आणि थेट कारवाई करण्यात आली. यादरम्यान अनेकांनी पोलिसांवर देखील जोरदार टीका केली. इतके मोठे ड्रग्ज रॅकेट सुरू असून पोलिसांनी अगोदरच कारवाई का नाही केली असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. गुरुवारी परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्ता आणि पोलिसांमध्ये मोठा राडा आहे. थेट पोलिसांची आणि उपोषणकर्त्याची बाचाबाची झाली आणि पोलिसांनी त्याला गाडीत टाकून नेले. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्ता वैजनाथ सुरवसे यांची धाराशिव पोलिसांकडून उचलबांगडी करण्यात आली. तुळजापूर ड्रग्स प्रकरणी तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख हे ड्रग्ज माफियाना पाठीशी घालत आल्याचा आरोप करत वैजनाथ सुरवसे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होते. मात्र, यादरम्यान त्यांनी काहीही झाले तरीही पालकमंत्र्यांना भेटणार अशी भूमिका घेतली.

उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना भेटण्यासाठी उपोषणकर्ते वैजनाथ सुरवसे जात असताना त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. काहीही झाले तरी आपण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना भेटणारच म्हणत पोलिसांशी हुज्जत घालताना उपोषणकर्ते वैजनाथ सुरवसे दिसले. बाचाबाची वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी उपोषणकर्त्याची उचलबांगडी केली. यावेळी काही काळ गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले. पोलिसांनी गाडीमध्ये टाकून उपोषणकर्त्याला नेले. वैजनाथ सुरवसे हे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र, पालकमंत्र्यांना भेटण्याच्या मुद्दावरून त्यांची आणि पोलिसांची बाचाबाची झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon