माटुंग्यात महत्त्वपूर्ण बैठक; नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना!
माटुंगा : मंगळवारी माटुंगा येथे सहाय्यक आयुक्त आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत परिसरातील नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे, प्रकाशव्यवस्था, पाणीपुरवठा आणि इतर नागरी समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नागरिकांच्या सोयीसाठी आणि परिसरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. विशेषतः रस्ते दुरुस्ती, जलनिकासी आणि प्रकाशव्यवस्थेच्या उभारणीसाठी वेगाने पावले उचलण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीस मुंबई उपाध्यक्ष श्री. रविराजा, नगरसेविका, मंडळ अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.