कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस स्टेशन यांचेकडून विशेष पोलीस अधिकारी सन्मान
योगेश पांडे/वार्ताहर
कल्याण – कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे विधानसभा निवडणूक २०२४ बंदोबस्त करीता कोळशेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील कॉलेज यांचेकडून ज्या विशेष पोलीस अधिकारी यांची मदत घेण्यात आली होती. त्यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक गुन्हे, पोलीस निरीक्षक प्रशासन यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमास पोलीस अंमलदार, पोलीस मित्र उपस्थित होते. सदर वेळी कमलादेवी कॉलेज, साकेत कॉलेज, मॉडेल कॉलेज, सनमयक कॉलेज, कल्याण पूर्व येथील १६ विशेष पोलीस अधिकारी, एनसीसी विद्यार्थी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.