पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

Spread the love

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुण्यामध्ये तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर भागामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुणे शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. किरण माणिक महामुनी, असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. पुण्यात तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील शिवाजीनगर भागात हा खळबळजनक प्रकार घडला आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस उपनिरीक्षकाने पुण्यात तरुणीसोबत संबंध ठेवल्याचा आरोप केला जात आहे.

संबंधित पोलीस निरीक्षकाने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीसोबत शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर पीडित तरुणीला जबरदस्तीने गर्भपात करण्यासाठी भाग पाडल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आता रक्षकच भक्षक बनल्याचं दिसत आहे. आपल्या सुरक्षेसाठी आपण पोलीसांची मदत घेतो, मात्र पोलीस अधिकाऱ्यांकडूनच अशा प्रकारच्या घटना समोर आल्यानंतर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon