नाशिकमध्ये १५ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेविका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Spread the love

नाशिकमध्ये १५ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेविका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक – शिंदखेडा तालुक्यातील चौगाव बुद्रुक येथील ग्रामसेविकेला १५ हजारांची लाच घेताना सोमवारी त्यांच्या घरी ताब्यात घेण्यात आले. राजबाई पाटील असे या ग्रामसेविकेचे नाव आहे. राजबाई पाटील यांना सुमारे ६० हजार रुपये वेतन आहे. शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

या बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचा शेती व ठेकेदारीचा व्यवसाय असून त्यांनी चौगाव ता. शिंदखेडा या ग्रामपंचायत हद्दीत पेवर ब्लॉकचे व रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम केले होते. सदर कामाचा निधी मंजूर होऊन ग्रामपंचायतच्या बँक खात्यात जमा झालेला होता. तक्रारदार यांना त्यांच्या देयकापोटी धनादेश अदा करण्यासाठी ग्रामसेविका राजबाई शिवाजी पाटील यांनी २५ हजार हजार रुपये लाचेची मागणी पंचांसमक्ष करून तडजोड अंती १५ हजार रुपये घेण्याचे मान्य केले व पंचांसमक्ष १५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलिस उपधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, निरीक्षक रूपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागूल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर व दीपाली सोनवणे या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon