महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून पळणारा जेरबंद

Spread the love

महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून पळणारा जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – कल्याण परिसरात रेल्वे मध्ये सामान,मोबाईल, चैन,पाकीट चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. रेल्वे पोलीस अनेकवेळा कारवाई करून देखील चोऱ्या कमी होताना दिसत नाही.अशीच एक घटना वाशिंद रेल्वे स्थानकात घडली. वाशिंद रेल्वे स्थानकात महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावणाऱ्या एकाला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश धुमाळ असे या चोरट्याचे नाव असून, तो मूर्तीकार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिंद रेल्वे स्थानकात लोकल सुरु होताच दारात उभा असलेल्या दिनेशने महिलेच्या गळ्यातील हिसकावली आणि पळ काढला. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिसांनी शोध सुरु करत स्टेशनवरील सीसीटीव्ही तपासले आणि त्याआधारे दिनेशला अटक केली. दरम्यान, पैशांची गरज असल्याने त्याने हि चोरी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon