मानपाडा पोलिसांची तत्परता; हरवलेली ₹३.५ लाखांची सोन्याची चैन अवघ्या ४ तासांत शोधून परत
महेंद्र (अण्णा) पंडित/प्रतिनिधी
ठाणे : नागरिकांच्या तक्रारीवर तात्काळ दखल घेत मानपाडा पोलीस ठाणे यांच्या पथकाने हरवलेली अंदाजे ₹३.५ लाख किमतीची सोन्याची चैन अवघ्या ४ तासांत शोधून तक्रारदारांना परत करत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदार यांची मौल्यवान सोन्याची चैन हरवली होती. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती तसेच विविध माध्यमांतून शोधमोहीम सुरू केली.
पोलिसांच्या जलद आणि अचूक तांत्रिक तपासामुळे हरवलेली अंदाजे ₹३.५ लाख किंमतीची सोन्याची चैन अवघ्या चार तासांच्या आत शोधण्यात यश आले. त्यानंतर सदर चैन तक्रारदारांना सुरक्षितरित्या परत करण्यात आली.
या तत्पर कारवाईमुळे तक्रारदारांनी मानपाडा पोलिसांचे आभार मानले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.