दुर्गाडी खाडीपूलावर भरधाव अज्ञात वाहनाची धडक; सायकलस्वार तरुणाचा मृत्यू

दुर्गाडी खाडीपूलावर भरधाव अज्ञात वाहनाची धडक; सायकलस्वार तरुणाचा मृत्यू

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडीपूलावर भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका सायकलस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शोएब अब्दुल करीम शेख (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शोएब शेख हा सायकलवरून दुर्गाडी खाडीपूल परिसरातून जात असताना अज्ञात भरधाव वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाणे येथे अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon