मालवणीत मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात गोंधळ; पोलिसांशीही हुज्जत

मालवणीत मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात गोंधळ; पोलिसांशीही हुज्जत

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई : मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरात मार्वे रोडवरील एका वाईन शॉपबाहेर मद्यधुंद अवस्थेतील तरुणीने भररस्त्यात गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित तरुणी मद्यप्राशन केल्यानंतर वाईन शॉपबाहेर मोठ्याने आरडाओरड करत होती. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांशी ती वाद घालत असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कळवले.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तरुणीला शांत करण्याचा प्रयत्न केला असता, तिने पोलिसांशीही हुज्जत घालत त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. काही काळ प्रयत्नांनंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून अनुशासनभंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधित तरुणीविरोधात कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon