माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणचे सासरे, मेहुण्याला मुंबईत अटक; भायखळा परिसरात एका तरुणासह त्याच्या नातेवाईकांना मारहाण केल्याच्या आरोप

माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणचे सासरे, मेहुण्याला मुंबईत अटक; भायखळा परिसरात एका तरुणासह त्याच्या नातेवाईकांना मारहाण केल्याच्या आरोप

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – माजी भारतीय क्रिकेटपटू आणि आणि पश्चिम बंगालमधील बहारामपूरचे खासदार युसूफ पठाण यांचे सासरे तसेच मेहुण्याला मुंबईत पोलिसांनी अटक केली आहे. भायखळा परिसरात एका तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकांना मारहाण केल्याप्रकरणी युसूफ पठाणच्या सासऱ्यांना, तसेच त्याचा मेहुणा आणि आणखी एका नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री सुमारे ९ च्या सुमारास, पाणी सांडल्यामुळे सुरू झालेल्या किरकोळ वादाचं हाणामारीत रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर खळबळ माजली असून, पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.

खरंतर, स्थानिक रहिवासी युसूफ खान हे गाडी चालवत घरी जात असताना, त्यांची गाडी एका खड्ड्यात आदळली आणि त्यातील पाणी शोएब खान याच्यावर उडालं. युसूफ खानने आपली गाडी थांबवून माफी मागितली होती, मात्र तरीही शोएबने त्याला शिवीगाळ केली आणि बांबूच्या काठीने गाडीची काच फोडून त्याला जखमी केलं. आणि तिथूनच हे भांडण पेटलं आणि खऱ्या अर्थानं वादाला सुरुवात झाली आणि अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

शनिवारी,१८ एप्रिलच्या रात्री ९ च्या सुमारास हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातं. ३० वर्षांचे युसूफ खान घरी परत येत होते, त्यांची कार पाण्याने भरलेल्या खड्ड्यातून गेली. आणि ते पाणी रस्त्यावरून जाणाऱ्या शोएब खान (३५) च्या अंगावर उडालं. मिळालेल्या माहितीनुसार, शोएब खान हा युसूफ पठाणचा नातेवाईक आहे.

ज्याची गाडी होती, त्या युसूफ खानने असा दावा केला की, त्याने तात्काळ गाडी थांबवून शोएबची माफी मागितली, पण परिस्थिती चिघळली आणि त्यांच्यात वाद झाला. शोएब खानने त्याला शिवीगाळ केली, बांबूच्या काठीने त्याच्या गाडीची काच फोडली आणि त्याला मारहाण केली, असाही आरोप करण्यात आला. त्यानंतर युसूफ खान घरी गेला आणि कुटुंबीयांच्या सल्ल्यानुसार त्याने पोलिसांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला.

मात्र, तो पोलीस ठाण्याच्या दिशेने जात असतानाच खालिद खान उर्फ मकालिक यांच्याशी त्याची गाठ पडली, जे क्रिकेटर युसूफ पठाणचे सासरे आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खालिद यांनी त्यांची मुलं, उमरशाद खान (३५), शोएब खान आणि दुसरा आरोपी शाहबाज पठाण, यांच्यासोबत पुन्हा भांडण करून युसूफ खान आणि त्याच्या कुटुंबाला मारहाण केली.

त्यानंतर याप्रकरणाचा तचपास करताना पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिलं. यानंतर, भायखळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खालिद खान, उमरशाद खान आणि शोएब खान यांना अटक केली. मात्र, आरोपी शाहबाज पठाण अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या तिन्ही आरोपींविरुद्ध मारहाण आणि गंभीर शारीरिक इजा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना २ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे वृत्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon