पुण्यात हातभट्टी साहित्य कारखान्यावर धाड; तिघांना अटक, ₹११.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुण्यात हातभट्टी साहित्य कारखान्यावर धाड; तिघांना अटक, ₹११.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस महानगर नेटवर्क 

 

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने येवलेवाडी परिसरात हातभट्टी दारू निर्मितीसाठी साहित्य तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ₹११ लाख २९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

उंड्री येथील मंतरवाडी–पिसोळी रस्त्यावर हातभट्टीसाठी लागणारे साहित्य वाहतूक करणारा टेम्पो पथकाने अडवला. त्यानंतर चालक बाळू शामराव साळवे याची चौकशी केली असता हे साहित्य सिंहगड कॉलेजसमोरील येवलेवाडी येथून आणण्यात येत असल्याचे समोर आले.

या माहितीच्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून कारखान्यातून लोखंडी बॅरल, अॅल्युमिनियमच्या थाळ्या, चाटू, वाहन तसेच अन्य साहित्य जप्त केले. या प्रकरणी कारखाना मालक असिफ उस्मान शेख आणि कामगार भिमा मोहन वाघेला यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू असून, अशी माहिती निरीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon