नौपाडा पोलिसांची तत्पर कारवाई; CCTVच्या मदतीने हरवलेली बॅग तक्रारदाराला परत

नौपाडा पोलिसांची तत्पर कारवाई; CCTVच्या मदतीने हरवलेली बॅग तक्रारदाराला परत

पोलीस महानगर नेटवर्क 

ठाणे : नौपाडा पोलीसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हरवलेली बॅग अवघ्या काही वेळात शोधून तक्रारदाराला सुरक्षित परत करण्यात आली. गावदेवी बस स्टॉप परिसरात रिक्षामध्ये प्रवास करताना संबंधित नागरिकाची बॅग हरवली होती.

तक्रार मिळताच नौपाडा पोलीसांनी परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू केली. फुटेजच्या आधारे संबंधित रिक्षाचा मागोवा घेण्यात आला. पोलिसांनी वेगाने हालचाली करत रिक्षा चालकाचा शोध घेत बॅग जप्त केली.

त्यानंतर बॅगमधील सर्व साहित्याची खात्री करून ती तक्रारदाराला सुखरूप परत देण्यात आली. या तत्पर आणि प्रभावी कारवाईबद्दल नागरिकांकडून नौपाडा पोलिसांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon