खरोसा येथे आईसह दोन चिमुकल्यांची विहिरीत उडी; कौटुंबिक वादाचा संशय

खरोसा येथे आईसह दोन चिमुकल्यांची विहिरीत उडी; कौटुंबिक वादाचा संशय

पोलीस महानगर नेटवर्क 

लातूर : औसा तालुक्यातील खरोसा येथे एका २५ वर्षीय महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हृदयद्रावक प्रकारामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

निकिता अमरदीप भूरे (वय २५) असे मृत महिलेचे नाव असून, तिची दोन लहान मुले शिवानी आणि शिवांश यांचाही या घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या घरालगत असलेल्या विहिरीत ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon