तत्पर तपासातून अपहृत मुलाचा शोध; कळवा पोलिसांची वेगवान कारवाई

तत्पर तपासातून अपहृत मुलाचा शोध; कळवा पोलिसांची वेगवान कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : कळवा पोलीस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्ह्यातील मुलाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून, सीसीटीव्ही फुटेज व रेल्वे यंत्रणांच्या समन्वयातून ही कारवाई पार पडली. या प्रकरणात गुन्हा रजि. क्र. १७८/२०२६ (बीएनएस १३७(२)) अंतर्गत नोंद करण्यात आली होती.

मुलाच्या अपहरणाची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला. यासोबतच रेल्वे मार्गाचा संभाव्य वापर लक्षात घेऊन रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि शासकीय रेल्वे पोलीस (GRP) यांच्याशी समन्वय साधण्यात आला.

रेल्वे स्थानक परिसरात विशेष लक्ष ठेवत शोधमोहीम राबवण्यात आली. विविध ठिकाणांहून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आणि अखेर अपहृत मुलाचा ठावठिकाणा निश्चित करण्यात यश मिळाले.

या तत्पर आणि समन्वयात्मक कारवाईमुळे मुलाचा सुरक्षित शोध लागला असून, कळवा पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon