अमरावतीत नाशिकसारखं कांड?

अमरावतीत नाशिकसारखं कांड?

१८० तरुणींचं शोषण, ३५० वीडियो वायरल; भाजप खासदार पोलीस अधीक्षक यांच्या भेटीला

योगेश पांडे / वार्ताहर

अमरावती – अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर नावाच्या युवकाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून ब्लॅकमेल करून इच्छा नसतानाही लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोप करण्यात आला आहे. या तरुणाने १८० तरुणींचे लैंगिक शोषण करून ३५० व्हिडिओ व्हायरल केल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे.

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच अमरावतीतही एका तरुणाने जवळपास २०० मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी याचसंदर्भाने जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली.याप्रकरणी तात्काळ पोलिसांनी एसआयटी स्थापन करावी तसेच संध्याकाळपर्यंत पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक न केल्यास बुधवारी एसपी कार्यालयासमोर आंदोलन करू , असा इशारा खासदार अनिल बोंडे यांनी दिला आहे.

याप्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर अनिल बोंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत असताना पोलिसांनी सुमोटो कारवाई का केली नाही? असा सवाल करीत गुन्हा दाखल करून कारवाई न केल्यास एसपी ऑफिसमोर आंदोलन करण्याचा इशारा अनिल बोंडे यांनी दिला आहे.

व्हायरल अश्लील व्हिडिओमध्ये असलेला तरुण मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर कुटुंबासह परतवाडा शहरातून फरार झाल्याचा आरोपही अनिल बोंडे यांनी केला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला गजाआड करावे, अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केली.भाविकांच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अशोक खरात या भोंदूबाबाने शेकडो महिलांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण केले. जवळपास ५८ व्हिडीओ पोलिसांच्या हाताला लागले. या प्रकरणात अनेक बड्या लोकांचे कनेक्शन समोर आल्यानंतर प्रकरणाची व्याप्ती वाढली. सध्या अशोक खरात पोलिसांच्या ताब्यात असून त्याची विशेष पोलीस पथकाकडून चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon